
भोसे : पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेकडून जवळपास १५ वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. रस्त्याचे रुंदीकरण आणि जकात नाका परिसर वाढीसाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी ही झाडे पाडण्यात आली आहेत; परंतु पर्यटनदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या या शहरात धोकादायक झाडे पाडण्यास अनेक दिव्य पार करावी लागत असताना स्वतः प्रशासन मात्र या वृक्षांवर बिनधास्त कुऱ्हाड चालवत असल्याने पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.