Jaykumar Gore
esakal
पंढरपूर : महिला डॉक्टर आत्महत्या (Woman Doctor Case) प्रकरणाचे सगळे रहस्य त्यांचा मोबाईल, दोन्ही संशयितांचे मोबाईल आणि इतर काही मोबाईलमध्ये आहे. पण कुणाच्या मृत्यूनंतर त्याचा अनादर करू नये, अशी आपली संस्कृती आहे. या प्रकरणाचे कोणीच राजकारण करु नये आणि मोबाईलधील वास्तव पुढे आणण्याची वेळ येऊ देऊ नये, असा इशारा ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी अप्रत्यक्षपणे रामराजे निंबाळकर व महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला.