

Satara Ganeshotsav Plastic Waste
esakal
सातारा: शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून उद्यापासून (शनिवार) लाडक्या बाप्पाला मोठ्या जल्लोषात आपापल्या मंडपात नेले जाणार आहे; पण या जल्लोषात अलीकडेच रूढ झालेला एक ट्रेंड शहरवासीयांच्या आणि विशेषतः पालिकेच्या डोकेदुखीचे कारण ठरतो. आगमन सोहळ्यांदरम्यान मोठ्या प्रमाणावर उडवले जाणारे ‘पेपर ब्लास्ट’ आणि प्लॅस्टिकयुक्त कागदांमुळे शहराच्या स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याने त्यावर यंत्रणांनी नियंत्रण आणावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.