
-सुनील शेडगे :
नागठाणे : उत्तम आरोग्य अन् निरोगी जीवनाचा मंत्र देताना ग्रामीण भागातील एका शेतकरी कुटुंबाने धावणे अन् सायकलिंगला प्राधान्य दिले आहे. त्यात आई-वडिलांसह त्यांच्या तिन्ही मुलांनी अनेक मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी केल्या आहेत. इतकेच नव्हे, तर त्यातील मुलीने मुंबईतील प्रतिष्ठेच्या टाटा मॅरेथॉन स्पर्धेतही यश मिळविले आहे.