
आई- वडिलांनीच केला मुलीचा खून
कऱ्हाड : आई- वडिलांनीच अल्पवयीन मुलीचा खून करून तीचा मृतदेह डोंगारावर पुरल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील एका गावात घडली. सायंकाळी उशिरा पोलिसांनी संशयितआई- वडिलांना अटक केली आहे. मुलीच्या प्रेम प्रकरणाच्या संशयातून खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. पंधरा दिवससपूर्वी खून करून तीचा पुरलेला मृतदेहव आज एक मे रोजी पोलिसांनी जमीन उकरून ताब्यात घेतला. ती मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार वडीलांनीच दिली होती.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तालुक्यातील गावात अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद 17 एप्रिल रोजी तालुका पोलिसात दाखल होती. मुलगी बेपत्ता झाल्याचे फिर्याद मुलीचे वडिलांनी दिली होती. फौजदार प दिपज्योती पाटील तपास करत होत्या. त्यांना त्यांच्या खबऱ्यांने माहिती दिली. मुलगीबाबत वडीलांवर शंका व्यक्त झाली. काल रात्री वडिलांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी मुलीचे वडिलांनी मुलीला प्रेमप्रकरणाच्या संशयातून मारल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसही हादरले.
त्या रागातून आई- वडिलांनीच मुलीचा खून केला. तो मृतदेह त्यांनी पवारवाडी येथील डोंगरात पुरला. पोलिसांनी आज (1 मे) सकाळी पोलिसांनी पवारवाडी येथे मुलीचा पुरलेला मृतदेह ताब्यात घेतला. तहसिलदार विजय पवार यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा केला. पोलिस निरीक्षक पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, तहसिलदार विजय पवार, फौजदार दिपज्योती पाटील, सहायक पोलिस निरिक्षक रेखा दूधभाते यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. सहायक पोलिस निरीक्षक रेखा दूधभाते तपास करत आहेत.