- सिद्धार्थ लाटकर
सातारा - शाळा प्रवेशासाठी आता पालक आतापासून चाचपणी करू लागले आहेत, तर दुसरीकडे काही शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या शाळांच्या प्रवेशाबाबतची जाहिरात करण्यास प्रारंभ केला आहे. अशा स्थितीत इंग्रजी माध्यमांच्या संस्थांकडून प्रलोभने अनेक दाखवली जातात अन् पालक त्यास बळी पडतात असे प्रकार अनेकदा घडतात. अनेकदा पालकांकडून अधिकृत नसलेल्या शाळेत प्रवेश घेतला जातो आणि संबंधित शाळा अनधिकृत असल्याचे समजल्यानंतर कपाळावर हात मारण्यापलीकडे काही राहात नाही. त्यामुळे शाळा प्रवेशाबाबत पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.