Table Tennis Tournament: 'मलवडीच्या पार्थ मगरने पटकावला तिहेरी मुकुट'; ४-स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेत माणचा डंका
पार्थने १७, १९ वर्षांखालील आणि पुरुष गट या तीन गटात सुवर्णपदक पटकावले. विविध जिल्ह्यांमधील अव्वल खेळाडूंकडून कडवी स्पर्धा असूनही पार्थने तिन्ही गटांमध्ये अचूकता, सातत्य आणि मानसिक धैर्य दाखवत विजय मिळवला.
Table Tennis Star Parth Magar Shines with Triple VictorySakal
दहिवडी: मुंबईतील वेलिंग्टन जिमखाना येथे नुकत्याच झालेल्या ४-स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेत माण तालुक्यातील मलवडीचा सुपुत्र पार्थ मगरने एकत्रित जिल्हा श्रेणीमध्ये तिहेरी मुकुट पटकावला आहे.