
सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर कार्यकर्त्यांत नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते. आता पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्याची जबाबदारी माझ्यावर सोपविल्यानंतर कार्यकर्त्यांत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात पक्ष बांधणीला प्राधान्य दिले जाणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्थानिक जिल्हाध्यक्ष व नेत्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली.