पाटणला 355 स्थलांतरित अनुदानासाठी 'अपात्र'; प्रशासनाचा अजब निर्णय

पाटण तालुक्यात २२ व २३ जुलैला झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने पाटण तालुक्यातील मोरणा व कोयना विभागातील पाच गावांमध्ये होत्याचे नव्हते झाले.
Subsidysubsidy
Subsidysubsidysakal

कोयनानगर - पाटण तालुक्यात २२ व २३ जुलैला झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने पाटण तालुक्यातील मोरणा व कोयना विभागातील पाच गावांमध्ये होत्याचे नव्हते झाले. अतिवृष्टीची प्रचंड हानी पोचलेल्या तब्बल ७६६ लोकांना प्रशासनाने स्वतः स्थलांतरित केले. मात्र, याच प्रशासनाने केवळ ४११ लोकांना सानुग्रह अनुदानासाठी पात्र ठरविले आहे. उर्वरित ३५५ स्थलांतरित लोकांना अपात्र ठरवून त्यांना सानुग्रह अनुदानापासून वंचित ठेवले आहे, तसेच दहा हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर करून आता केवळ अडीच हजार रुपये संबंधितांच्या खात्यावर जमा केल्याबद्दलही नाराजी व्यक्त होत आहे.

पाटण तालुक्यातील कोयना व मोरणा विभागातील गावेच्या गावे भूस्खलनाची भीती असल्याने स्थलांतरित केली आहेत. शासनाच्या नियमानुसार ज्या लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरले, त्यात त्यांचे नुकसान झाले आशा लोकांनाच सानुग्रह अनुदान वाटप करण्याचे आदेश आहेत. या नियमामुळे कोयना विभागातील पाच गावांतील ४९६, तर मोरणा भागातील सहा गावांतील २७० अशी एकूण ७६६ आपत्तीग्रस्त लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

Subsidysubsidy
येरळावरील बंधाऱ्याच्या फळ्या चोरीला; उत्तर भागात तीव्र पाणीटंचाई

मात्र, स्थलांतरित ७६६ असले, तरी प्रशासनाने मात्र, ४११ लोकांनाच सानुग्रह अनुदानासाठी पात्र ठरविले आहे. उर्वरित ३५५ स्थलांतरित लोकांना अपात्र ठरवून त्यांना सानुग्रह अनुदानापासून वंचित ठेवले आहे. प्रशासनाने पाटण, आंबेघर, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, काळगाव, शिरळ, नेरळे, गव्हाणवाडी, हेळवाक, शिवंदेश्वर, म्हावशी, किसरुळे, गोकूळ तर्फ हेळवाक, देशमुखवाडी या गावांतील ४११ बाधितांना अनुदानासाठी पात्र ठरवले आहे. शासनाने या ४११ बाधित लोकांसाठी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान चार टप्प्यात देणार आहे. अडीच हजार रुपयांचा पाहिला हप्ता या लोकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला असल्याचे पाटण तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत दहा लाख २७ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान वाटप झाले आहे.

तहसीलदार योगेश्वर टोंपेही निर्णयाशी ठाम

प्रशासनाने स्थलांतरित केलेल्या लोकांची खरी संख्या ७६६ असली तरी प्रशासनाने या लोकांना डावलून अनेक ठिकाणी बोगस बाधित उभे करून सानुग्रह अनुदानाची मदत वाटली आहे. पाटण शहरात झालेली तक्रार हा मोठा पुरावा आहे. जे दरडग्रस्त अंगावर घातलेल्या कपड्यानिशी घराबाहेर पडले तेच वंचित आहेत. याबाबत तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्याशी संपर्क साधला असता सानुग्रह अनुदानासाठी ४११ बाधित लोक पात्र आहेत. ज्यांची घरे सुरक्षित आहेत. ज्यांच्या घरात पाणी शिरले. पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे त्यांना सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. आतापर्यंत दहा लाख २७ हजार ५०० रुपये बाधितांना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com