
पाटण : देसाई कारखान्याची निवडणूक बिनविरोध
पाटण : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी १६ जणांनी व आज (बुधवारी) दुसऱ्या दिवशी इतर मागासवर्गीय मतदारसंघातील पांडुरंग बबन शिरवाडकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. १७ जागांसाठी १७ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुनील गाढे व तहसीलदार रमेश पाटील यांनी दिली. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे.
उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी इतर मागासवर्गीय प्रतिनिधी वगळता अन्य पाच मतदारसंघांतील १६ उमेदवार बिनविरोध झाले होते. पांडुरंग शिरवाडकर व शंकरराव पाटील या दोघांचे इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज शिल्लक होते. त्यापैकी शिरवाडकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने नूतन संचालक मंडळ पूर्णपणे बिनविरोध झाले आहे. बिनविरोध संचालकांमध्ये सर्वसाधारण तथा ऊसउत्पादक प्रतिनिधींमधून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, युवा नेते यशराज देसाई,
अशोकराव पाटील, सोमनाथ खामकर, प्रशांत पाटील, शशिकांत निकम, सर्जेराव जाधव, पांडुरंग नलवडे, सुनील पानस्कर, बळिराम साळुंखे, प्रशांत पाटील, महिला प्रतिनिधीमधून दीपाली पाटील, जयश्री कवर, भटक्या विमुक्त जातीमधून भागुजी शेळके, अनुसूचित जातीमधून विजय सरगडे, संस्था प्रतिनिधी दिलीपराव चव्हाण आणि इतर मागासवर्गीय या मतदारसंघातून शंकरराव पाटील या १७ उमेदवारांची बिनविरोध संचालक पदासाठी निवड स्पष्ट झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा उमेदवारी अर्ज माघारी प्रक्रियेनंतर केली जाणार आहे.
Web Title: Patan Election Desai Factory Unopposed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..