Adani 2700 MW project latest update
esakal
-सूर्यकांत पाटणकर
पाटण : तालुक्याच्या उत्तर भागातील मराठवाडी (निवकणे) येथे अदानी ग्रीन एनर्जीच्या २७०० मेगावॉट क्षमतेच्या एकात्मिक पंप स्टोरेज प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने पर्यावरणीय मंजुरी दिली (Adani Green Energy Maharashtra investment) आहे. तब्बल १४ हजार ९५२ कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे निवकणे येथील रखडलेल्या जलसिंचन प्रकल्पाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, जलसंपदा विभागाने अद्याप हा प्रकल्प अदानी ग्रीन एनर्जीकडे हस्तांतरित न केल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याबाबत अनिश्चितता आहे.