Ambeghar Landslide : 11 मृतदेह बाहेर काढण्यात 'NDRF'ला यश

Landslide in Ambeghar
Landslide in Ambegharesakal

मोरगिरी (सातारा) : पाटण तालुक्यातील आंबेघर (Patan Taluka Landslide) येथे रात्री अडीच्या दरम्यान दरड कोसळून (Landslide in Ambeghar) चार कुटुंबातील चौदा जण गाडल्याची घटना शुक्रवारी घडली होती. त्याठिकाणी आज सकाळी मदतकार्याला सुरुवात झाली. मात्र, एनडीआरएफचे पथक (NDRF Team) येण्याअगोदरच स्थानिक ग्रामस्थांनी सहा मृतदेह बाहेर काढले व उर्वरित मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले. जवळपास अकरा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यामध्ये लहान मुलांचा समावेश असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते. त्याचबरोबर ‌बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. (Patan Taluka Landslide NDRF Team Succeed In Finding 11 Dead Bodies At Ambeghar bam92)

Summary

पाटण तालुक्यातील आंबेघर येथे रात्री अडीच्या सुमारास दरड कोसळून चार कुटुंबातील चौदा जण गाडल्याची घटना शुक्रवारी घडली होती.

मोरणा गुरेघर धरणाअंतर्गत वसलेलं आंबेघर हे छोटोसं गाव. अवघ्या पंधरा उंबरा असलेलं गाव म्हणजे, खालचे आंबेघर. संपूर्ण गावावरच दरड कोसळल्याने गावातील १० पैकी सहा कुटुंब सुरक्षित स्थळी हलवण्यात स्थानिकांना यश आले. रात्री दोननंतर अंधारात गोंधळ उडाला. मुसळधार पाऊस आणि तुटलेले रस्ते यामुळे शासकीय यंत्रणा व मदत कार्य त्या ठिकाणी पोहचू शकत नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी मदतीसाठी एनडीआरएफचे पथक दाखल झाले.

Patan Taluka Landslide
Patan Taluka Landslide

परंतु, गोकुळ गावाजवळ रस्ते तुटल्याने ते त्या ठिकाणी अडकून पडले. त्यांना या ठिकाणी पोहचण्यासाठी चालत जावे लागले. तोपर्यंत स्थानिक पातळीवर ग्रामस्थांनी मदत कार्याला सुरुवात केली व सहा मृतदेह बाहेर काढले. त्यानतंर एनडीआरएफचे पथक बाराच्या दरम्यान घटनास्थळी पोहोचले. प्रत्यक्ष मदत कार्याला सुरुवात झाली. दुपारीपर्यंत अकरा मृतदेह बाहेर काढले. यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे. लक्ष्मण कोळेकर, अनुसया कोळेकर, लक्ष्मी कोळेकर, विनोद कोळेकर, महेश कोळेकर यांची नावे निष्पन्न झाली असून उर्वरित मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. यावेळी नातवाईकांचा आक्रोश ह्रदय पिळवणारा होता.

Landslide in Ambeghar
..अखेर NDRF आंबेघरात पोहोचली
NDRF Team
NDRF Team

पावसाने थोडी उघडीप दिल्याने रस्त्यावरील पाणी ओसरले होते. त्यामुळे शासकीय यंत्रणेला त्याठिकाणी पोहोचता आले. दीडच्या दरम्यान जिल्हास्तरीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सामाजिक स्वयंसेवी संस्था, स्थानिक ग्रामस्थ त्याचबरोबर कराड, पाटण, पुणे, सातारा येथील लोक मदत घेवून घटनास्थळी येत होते. आंबेघरलाच लागून असलेला डोंगर पूर्ण कोसळून खाली आल्यामुळे गावाच्या अलीकडे तीन किलोमीटरवर राडारोडा पसरला होता. चिखलाचा खच साचला होता. त्यामुळे जेसीबीसह कोणतीच यंत्रणा तिथे पोहोचू शकली नव्हती. अतिवृष्टीमुळे तुटलेले रस्ते यामुळे मदतकार्य वेळेत पूर्ण होवू शकले नाही. पालकमंत्री बाळासाहेब पाटील Minister Balasaheb Patil, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई Minister Shambhuraj Desai, जिल्हाधिकारी शेखर सिंग, सत्यजित पाटणकर हे या घटनेची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत.

Patan Taluka Landslide NDRF Team Succeed In Finding 11 Dead Bodies At Ambeghar bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com