Shambhuraj Desai
esakal
सातारा : पाटण तालुक्यातील पर्यटन (Patan Tourism) संवर्धनासाठी ७० कोटी रुपयांच्या पाच नवीन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन एका महिन्यात काम सुरू होईल, तसेच पाटण तालुक्यात माथेरानच्या धर्तीवर ‘मिनी ट्रेन’ सुरू करण्याचा विचार आहे. रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करून या प्रकल्पाचा प्रस्ताव बनवण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली.