सातारा जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट बंद; रुग्णांची गैरसोय

Hospital
Hospital
Summary

विशेषत: रुग्णांची ने-आण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा जास्त त्रास होत आहे.

सातारा: कोरोना संसर्गातून सर्वसामान्य नागरिकांची मुक्तता करण्यासाठी अहोरात्र झगडणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंद लिफ्टचा झटका सोसावा लागत आहे. विशेषत: रुग्णांची ने-आण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा जास्त त्रास होत आहे. तो टाळण्यासाठी रुग्णालयातील लिफ्ट तातडीने सुरू करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी तातडीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Hospital
सातारा : अनैतिक संबंधातून पत्नीसह प्रेयसीचा काढला काटा

जिल्हा रुग्णालयात आधुनिक उपचार देण्याच्या घोषणा नेहमीच होत आहेत; परंतु मूळच्या पायाभूत सुविधा रुग्णांना पुरविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या रचनेनुसार महिलांच्या वैद्यकीय शस्त्रक्रिया, भाजलेल्या रुग्णांचा, पुरुषांच्या शस्त्रक्रिया, लहान मुलांचा विभाग व प्रसुती कक्ष वरच्या मजल्यावर आहे. रुग्णालयाचे मुख्य शस्त्रक्रियागृहही वरच्या मजल्यावरच आहे. त्यामुळे रुग्णालयातील बहुतांश रुग्ण हे वरच्या मजल्यावरच असतात. खालच्या वॉर्डमध्ये असणाऱ्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी वरच्या मजल्यावर, तर वरच्या मजल्यावर असणाऱ्यांना एक्‍सरे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी यासाठी खालच्या मजल्यावर यावे लागते.

Hospital
सातारा: प्रवीण जाधव आपल्या गावी परतला; पाहा व्हिडिओ

दिवसभरात अशा सुमारे ३० ते ४० रुग्णांना, तसेच रुग्णालयीन कर्मचारी किंवा त्यांच्या नातेवाइकांना खाली-वर ये-जा करावे लागते. त्यासाठी लिफ्टचा वापर आवश्‍यकच असतो. गंभीर किंवा चालता न येणाऱ्या रुग्णांना कर्मचाऱ्यांनाच खाली-वर करावे लागते. लिफ्ट बंद असल्याने त्यांना रॅम्पचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे, तसेच रॅम्पवरून नेताना रुग्णाचीही हेळसांड होत असते. एखादा जास्त वजनाचा रुग्ण रॅम्पवरून नेताना कर्मचाऱ्याचा दम निघाला तर त्या रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. गेल्या महिनाभरापासून जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट बंद आहे. त्यामुळे रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे. त्याचबरोबर गर्भवती महिला व गंभीर आजाराच्या रुग्णांची हेळसांड होत आहे. ती थांबविण्यासाठी जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाने तातडीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Hospital
'प्रवीणच्या कुटुंबीयांना सातारा सोडण्याची वेळ येवू देणार नाही'

रुग्णालय व्यवस्थापनाची जबाबदारी

कोरोना संसर्गाच्या कालावधीमध्ये रुग्णालयातील आंतररुग्ण विभागाचा भार वाढला आहे. या संसर्गाच्या काळात कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम केले. आजही करत आहेत. आता कोरोना रुग्णांबरोबर अन्य आजारांच्या रुग्णांवरही उपचार प्राधान्याने सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरविणे रुग्णालय व्यवस्थापनाची जबाबदारी आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com