सरकार विरोधात जनतेत चीड : शिवेंद्रसिंहराजे भोसले

विजय सपकाळ
Saturday, 28 November 2020

येथे भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या प्रचारार्थ झालेल्या बैठकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.

मेढा (जि.सातारा) : वीजबिल चुकीच्या पद्धतीने आकारल्याने नियमित बिलापेक्षा जादा बिले आली ही वस्तुस्थिती आहे. तीन पक्ष एकत्र काम करताना प्रत्येकाच्या धोरणानुसार वेगवेगळे निर्णय होतात. वीज बिलात सूट, शेतकऱ्यांची कर्जमापी, तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची सानुग्रह 50 हजार अनुदान असे जाहीर केलेले निर्णय थांबवले जात आहेत. सरकारच्या विरोधातील जनतेतील आक्रोश आणि चीड दाखविण्यासाठी पदवीधरांच्या न्याय्य हक्कासाठी भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना विजयी करा, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
 
येथे भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या प्रचारार्थ झालेल्या बैठकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष अनिल शिंदे, उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, ज्ञानदेव रांजणे, जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे, पंचायत समिती सदस्य विजय सुतार, कांताबाई सुतार, नगरसेवक पांडुरंग जवळ, विकास देशपांडे, नारायण देशमुख, कल्पना जवळ, एकनाथ रोकडे, कांतीभाई देशमुख, मोहनराव कासुर्डे, तुकाराम धनावडे, सागर धनावडे, भानुदास ओंबळे, प्रशांत करंजेकर, गीता लोखंडे, सोनिया धनावडे, कविता धनावडे आदी उपस्थित होते. दत्तात्रय पवार यांचेही भाषण झाले. नगरसेवक शशिकांत गुरव यांनी सूत्रसंचालन केले. श्रीहरी गोळे यांनी आभार मानले. प्रारंभी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

आनेवाडी टोलनाका प्रकरणात शिवेंद्रसिंहराजेंसह 17 समर्थकांना जामीन

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा विधानसभेचा प्रचार करणाऱ्या सभापती जयश्री गिरी व उपसभापती सौरभ शिंदे राष्ट्रवादीच्या मेळाव्याला व्यासपीठावर आल्यावर राष्ट्रवादीचे दीपक पवार निघून गेले. या वेळी आमदार शशिकांत शिंदेंनी त्यांची समजूत काढू, असे विधान केल्यावर तालुक्‍यात चर्चा रंगली होती. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे काय बोलणार याकडे लक्ष लागले होते.

याबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""मी कधीच कुरघोडीचे राजकारण करत नाही. विकासकाम हेच माझे उत्तर. कोण कोणत्या स्टेजवर बसतात. संधिसाधू कोण आहेत. त्यांना योग्य वेळी मतदानातून मतदार जागा दाखवतात. त्यामुळे विकास आजही झाला. उद्याही करणार आहे.'' 

खूप बाेलण्याची इच्छा असलेल्या पवारांनी बाळासाहेबांची कमिटमेंट पाळली 

दरम्यान, सभापती जयश्री गिरी, उपसभापती सौरभ शिंदे, माजी सभापती अरुणा शिर्के गैरहजर होत्या. जिल्हा परिषदेचे सदस्य वसंतराव मानकुमरे व माजी उपसभापती दत्ता गावडे यांनी राष्ट्रवादी व भाजपच्या दोन्ही मेळाव्याला दांडी मारली.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People Are Not Happy With Maharashtra Government Work Says BJP MLA Shivendrasinghraje Bhosale Satara News