
फलटण विधानसभा मतदारसंघाकडे निवडणूका जाहीर झाल्यापासून सगळ्यांच्या नजरा हाेत्या. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाने मोठी ताकद लावली होती. नुकत्याच माढा लोकसभा निवडणुकीत फलटणमध्ये शरद पवार गटाचे धैर्यशील माेहिते-पाटील व भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात चुरशीची लढत झाली होती. मात्र विधानसभेला सचिन पाटील यांनी 17046 मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला आहे.