

ACB Action in Phaltan Agent Caught Accepting 50000 Rupees Bribe in the Name of Sub Divisional Officer
sakal
दुधेबावी : फेरफार रद्द करण्याच्या अपिलातील विलंबमाफीचा अर्ज मंजूर करून घेण्यासह अपिलाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या नावाने ५० हजार आणि स्वतःसाठी दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या खासगी एजंटास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५० हजार रुपये स्वीकारताना पकडले. ही कारवाई फलटण येथील गिरवी चौकातील लॉ कॉलेजसमोर काल करण्यात आली.