फलटणमध्ये मुलांकडून वडिलांचा खून, दारुच्या नशेत प्रकार

किरण बोळे
Tuesday, 20 October 2020

रात्री दोननंतर वडील व मुले एकत्र झोपली होती. आई त्याच घरात आतील बाजूला झोपलेली होती. पहाटे तीन वाजता आवाज आल्यानंतर आई उठली. त्यावेळी दोघे मुले टीव्ही लावून दंगा करत होती. वडील देशपांडे बेशुद्ध होते. त्यांच्या एका कानातून रक्त येत होते. त्यांना पहाटे लाइफलाइन हॉस्पिटल येथे नेले असता, डॉक्‍टरांनी मृत झाल्याचे घोषित केले.

फलटण (जि. सातारा) : शहरातील सगुणामातानगर मलठण येथील बाळू गणपत देशपांडे (वय 50) यांचा त्यांच्या दोन्ही मुलांनी दारूच्या नशेत खून केल्याने फलटण तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यामधून मिळालेली माहिती अशी, आज (ता. 20) पहाटे दोन ते तीनच्या सुमारास सगुणामातानगर मलठण येथे जॉन डिअर ट्रॅक्‍टर शोरूमच्या समोरील झोपडपट्टीत राहणारे बाळू गणपत देशपांडे (वय 50) यांचा त्यांची मुले तेजस उर्फ सोन्याभाऊ देशपांडे, शिवतेज देशपांडे यांनी दारुच्या नशेमध्ये खून केला. झोपण्यापूर्वी वडील त्यांची भांडणे सोडवत होते. रात्री दोननंतर वडील व मुले एकत्र झोपली होती. आई त्याच घरात आतील बाजूला झोपलेली होती. पहाटे तीन वाजता आवाज आल्यानंतर आई उठली. त्यावेळी दोघे मुले टीव्ही लावून दंगा करत होती. वडील देशपांडे बेशुद्ध होते. त्यांच्या एका कानातून रक्त येत होते. त्यांना पहाटे लाइफलाइन हॉस्पिटल येथे नेले असता, डॉक्‍टरांनी मृत झाल्याचे घोषित केले.

चाफळ : पंचनामे करण्याच्या नेमणुका तलाठ्यांसाठी गैरसोयीच्या 

दारूच्या नशेत बाळू देशपांडे यांना कोणत्या तरी कारणावरून वीट व इतर हत्याराने मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला. याबाबतची फिर्याद मृताची पत्नी नंदा बाळू देशपांडे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. त्यामध्ये वीट, इतर हत्यार याचा वापर करून मुलांनी आपल्या वडिलांचा खून केला, असे म्हटले आहे. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी भेट दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर करीत आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Phaltan The Children Beat Up The Father Satara News