

Phaltan Celebrates Kavadi Tradition with Chant of Mahadev
sakal
दुधेबावी: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर यात्रेत सहभागी होण्यासाठी पुरंदर तालुक्यातून निघालेल्या मानाच्या कावड्या शनिवारी फलटण शहरात दाखल झाल्या. ‘शंभू महादेव’च्या गजरात या कावड्यांचे स्वागत करण्यात आले, तर संपूर्ण शहर भक्तिरसात रंगून गेले.