

A Swift car fell into a 20-foot ditch near Railway Gate No. 96 at North Koparde after losing control at an S-shaped turn; all five occupants survived safely.
Sakal
कोपर्डे हवेली : फलटणहून कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनासाठी निघालेल्या स्विफ्ट कारचा रेल्वे गेट क्रमांक ९६ जवळ अपघात झाला. पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास अंधारात एस आकाराच्या वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या सुमारे २० फूट खोल खड्ड्यात कोसळून तीन वेळा पलटी झाली. सुदैवाने कारच्या एअरबॅग उघडल्याने चालकासह कारमधील पाचही प्रवासी गंभीर दुर्घटनेतून सुखरूप बचावले.