esakal | फलटण-लोणंद-पुणे मार्गावरील रेल्वेची चाके थांबली; 30 जूनपर्यंत सेवा बंद!
sakal

बोलून बातमी शोधा

Railway Service

फलटण-लोणंद-पुणे मार्गावरील रेल्वेची चाके थांबली; 30 जूनपर्यंत सेवा बंद!

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (सातारा) : फलटण-लोणंद-पुणे या मार्गावरील रेल्वेची (Railway) चाके थांबविण्यात आली आहे. गेले महिनाभर ही गाडी प्रवाशांविना धावल्याने व या मार्गावरील रेल्वे लाइनचे काम सुरू असल्याने कालपासून (ता. 7) ही रेल्वे बंद करण्यात आली. 30 जूनअखेर ती बंद ठेवण्यात येणार आहे. (Phaltan Lonand Pune Railway Service Closed Satara News)

या रेल्वे सेवेचा प्रारंभ 30 मार्च रोजी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ऑनलाइन हिरवा झेंडा दाखवून, तर फलटण रेल्वे स्थानकामधून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, मंडल रेल प्रबंधक रेणू शर्मा, अतिरिक्त महाप्रबंधक बी. के. दादाभाई, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, श्रीमती मंदाकिनी नाईक- निंबाळकर, ऍड. जिजामाला नाईक- निंबाळकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाला होता.

Good News : जिल्हा बॅंकेकडून व्हेंटिलेटरसाठी तीन कोटी; आमदार शिवेंद्रसिंहराजे, रामराजेंचा पुढाकार

या रेल्वे गाडीमुळे फलटण शहर व तालुका थेट पुण्याशी जोडले गेले होते. त्यामुळे त्याचा फायदा येथील शेतकरी, व्यापारी, नोकरदार, विद्यार्थ्यांना होणार असला, तरी कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. रुग्णांमध्येही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे लॉकडाउनमुळे गेले महिनाभरापासून ही गाडी प्रवाशांविना रिकामीच धावत होती. गाडी रिकामीच धावत असल्याने व या मार्गावर रेल्वे लाइनचे काम सुरू असल्याच्या कारणावरून कालपासून ही रेल्वे सेवा थांबविण्यात आली आहे. 30 जूनअखेर ही रेल्वे सेवा बंदच ठेवण्यात येणार आहे.

पुण्याला जाण्यासाठी पास काढावा लागणार : पुण्याला जाण्यासाठी रेल्वेचा प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना आता लोणंद रेल्वे स्थानक गाठावे लागणार आहे. मात्र, रेल्वे प्रवासासाठी फलटण प्रांताधिकारी कार्यालयातून प्रवाशांना क्‍यूआर कोड आधारित ओळखपत्र किंवा पास काढावा लागणार आहे. त्याशिवाय कुणालाही रेल्वे प्रवास करता येणार नाही.

(Phaltan Lonand Pune Railway Service Closed Satara News)

loading image