esakal | Good News : जिल्हा बॅंकेकडून व्हेंटिलेटरसाठी तीन कोटी; आमदार शिवेंद्रसिंहराजे, रामराजेंचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

Satara District Bank

Good News : जिल्हा बॅंकेकडून व्हेंटिलेटरसाठी तीन कोटी; आमदार शिवेंद्रसिंहराजे, रामराजेंचा पुढाकार

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोनात व्हेंटिलेटर (Ventilator) बेडविना रुग्णांचा होणारा मृत्यू रोखण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने पुढाकार घेतला आहे. यावर्षी शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच कोविड सेंटरला (Covid Centre) बॅंकेच्या खर्चातून तीन कोटी रुपयांचे व्हेंटिलेटर व ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) व संचालक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Three Crore Assistance For Ventilator From Satara District Bank Satara News)

बॅंकेस या आर्थिक वर्षात 149.22 कोटींचा करपूर्व नफा झाला असून, करोत्तर 107 कोटी 36 लाखांचा नफा झाला आहे, असे सांगून सभापती रामराजे व शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""शेतकऱ्यांना एक ते तीन लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के दराने उपलब्ध केले आहे. शैक्षणिक कर्जावरील संपूर्ण व्याजात सूट देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी एक कोटी एक लाख 79 हजारांची तरतूद केली आहे. बॅंकेच्या सभासद संस्थांना 15 टक्के लाभांश देण्यासाठी 33.33 कोटींची तरतूद केली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाशी झालेल्या करारानुसार 168 बेरोजगार तरुणांना 14.56 कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले आहे.''

Reservation : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरंच 10 वर्षांसाठी आरक्षण हवे होते? जाणून घ्या 'सत्य'

कोरोनाशी मुकाबल्यासाठी जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता व्हावी, यासाठी जिल्हा बॅंकेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी बॅंकेने जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा परिषदेची आरोग्य केंद्रे, तसेच कोविड सेंटरला ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर व व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यासाठी तीन कोटींचा निधी उपलब्ध करून देत आहे. यातून व्हेंटिलेटर बेड व ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी केले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले. या वेळी संचालक आमदार शशिकांत शिंदे, अनिल देसाई, नितीन पाटील, कांचन साळुंखे, राजेंद्र राजपुरे, दत्ताननाना ढमाळ, राजेश पाटील वाठारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, तसेच अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना मेडिक्‍लेम सुविधा

यावर्षी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी ग्रुप मेडिक्‍लेम पॉलिसी सुरू करण्यात आली आहे, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, ""या योजनेत बॅंकेचे कर्जदार शेतकरी व त्याची पत्नी किंवा कुटुंबातील एका सदस्यास गंभीर आणि विशिष्ट आजारासाठी हॉस्पिटल खर्च व शस्त्रकियेसाठी एक लाख रुपये उपलब्ध होणार आहेत. या योजनेत कॅशलेस उपचार केले जाणार आहेत.''

Three Crore Assistance For Ventilator From Satara District Bank Satara News

loading image
go to top