
फलटण: आगामी गणेशोत्सव व ईद- ए- मिलाद काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी फलटण तालुका पोलिस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीला जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले. स्वप्नील रमेश निकम (वय २८) रोहन रवींद्र ऊर्फ बाळासाहेब निंबाळकर (वय २४), ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली हिराचंद निंबाळकर (वय ३५), सागर संभाजी निंबाळकर (वय ३५), सूरज ऊर्फ सोनू धनाजी भोईटे (वय ३०), विनोद भिकोजी ऊर्फ भीमराव भोईटे (वय ३९ सर्व रा. राजाळे, ता. फलटण) अशी सराईत टोळीच्या सदस्यांची नावे आहेत.