
दुधेबावी : पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीचा फलटण ग्रामीण पोलिसांकडून अवघ्या आठ तासांत पर्दाफाश करण्यात आला आहे. धुमाळवाडी व वारुगडच्या डोंगराळ भागातून पाठलाग करून तीन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. दीपक नामदेव मसुगडे (वय ३०, रा. नवलेवाडी, ता. माण), विलास ऊर्फ बाबू दत्तात्रय गुजले (वय २१, रा. खांडज, ता. बारामती), चेतन शंकर लांडगे (वय २५, रा. सोनगाव बंगला, ता. फलटण) अशी त्यांची नावे आहेत.