

Ranjitsinh Naik-Nimbalkar
फलटण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईकबोमवाडी एमआयडीसीत मोठा उद्योग आणण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील १० ते २० हजार युवकांच्या हाताला रोजगार मिळणार असताना रामराजे व त्यांच्या बंधूंच्या पोटात का दुखते. विधान परिषदेचे सभापती असताना त्यांनी केवळ राजकीय आकसातून एमआयडीसी प्रकल्प रद्द करण्याच्या बैठका घेतल्या, असा आरोप माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला.