
आसू : ठाकुरकी (ता. फलटण) येथे युवकाचा खून करून मृतदेह अर्धवट अवस्थेत पुरल्याचे आढळून आले आहे. संदीप मनोहर रिटे (वय ३५, रा. ठाकुरकी, ता. फलटण) असे या युवकाचे नाव असून, डोक्यावर, गळ्यावर गंभीर जखमा व गुप्तांग अर्धवट कापलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने फलटण व परिसरात खळबळ उडाली आहे.