

Citizens of Phaltan lighting candles in memory of the young doctor, demanding justice through a peaceful march.
Sakal
आसू : येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या मृत्यूप्रकरणाने सर्व महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर फलटणकर आज रस्त्यावर उतरले. फलटण येथे शेकडोंच्या उपस्थितीत आज सायंकाळी गजानन चौकात कॅंडल मार्च काढून अतिशय शांततेने या घटनेचा निषेध केला. या प्रकरणातील संशयितांना फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी करत नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली.