

Police and local residents gather at the assault spot in Phaltan following consecutive attack incidents.
फलटण : शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिस भरतीसाठी संगणक प्रशिक्षण वर्गात शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली. दरम्यान, ही मारहाण सुरू असताना मध्यस्थी करण्यासाठी धावलेल्या स्थानिक व्यापाऱ्यासही संबंधित युवकांनी धमकावून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.