Panchgani Pinewood School: पाचगणीतील पाईनवुड इंटरनॅशनल स्कूलची मान्यता धोक्यात; शिक्षण विभागाची मोठी कारवाई, मान्यता रद्दीची शिफारस..

ICSE school in Maharashtra faces scrutiny over rule violations and complaints: मुख्याध्यापकांच्या मनमानी, नियमबाह्य कारभारावर शिक्षण विभागाचा घणाघात; पालक-शिक्षकांच्या तक्रारींनंतर पाईनवुड स्कूलची मान्यता रद्द होण्याच्या उंबरठ्यावर
Kolhapur Board Receives Proposal to Cancel Recognition of Panchgani’s Pinewood School

Kolhapur Board Receives Proposal to Cancel Recognition of Panchgani’s Pinewood School

esakal

Updated on

​पाचगणी : पर्यटन आणि दर्जेदार शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांचगणी येथील 'पाईनवुड इंटरनॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज' प्रशासन सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाच्या मनमानी व नियमबाह्य कारभारामुळे या शाळेची मान्यता रद्द करण्याची अत्यंत गंभीर कारवाई शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी या शाळेची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (कोल्हापूर विभागीय मंडळ) कडील मान्यता काढून घेण्यासाठी शिक्षण उपसंचालकांकडे 'स्वयंस्पष्ट शिफारस' पाठवली आहे. त्यामुळे या नामांकित शाळेची मान्यता आता अंतिम टप्प्यात रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com