Satara Tourism News : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अस्वलाचे दर्शन; मुंबईच्या पर्यटकांना सुखद धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sahyadri tiger project
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अस्वलाचे दर्शन; मुंबईच्या पर्यटकांना सुखद धक्का

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अस्वलाचे दर्शन; मुंबईच्या पर्यटकांना सुखद धक्का

कोयनानगर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत(sahyadri tiger project) असणाऱ्या कोयना अभयारण्यात(koyna forest) मुंबईहून आलेल्या पर्यटकांना अस्वलाचे (sloth bear) दर्शन झाले. त्यामुळे पर्यटकांना मोठा आनंद झाला. दरम्यान, त्याच्या दर्शनाने त्या अभयारण्यातील अस्वलाचे अस्तित्व स्पष्ट झाले आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत असणारे कोयना व चांदोली अभयारण्य हे पर्यटकांना एक खास आणि मानवी हस्तक्षेप नसलेले पर्यटनक्षेत्र झाले आहे. येथील वनसंपदा, वन्यजीव, सडेपठार, उंचच -उंच धबधबे, आकर्षित अशा डोंगररांगा, येथील रंगिबेरंगी फुलपाखरे, पक्षी, जैव विविधतेने नटलेला परिसर, संशोधकांसाठी उत्तम असे पश्चिम घाटात येत असलेले ठिकाण, येथील विविध वनस्पती, प्राणी, पक्षी त्यामुळे पर्यटकांना भुरळ घालत आहे.

हेही वाचा: सातारा : भरारी पथकांच्या माध्यमातून कोरोना नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई

कोयना विभागातील(kokan division) स्थानिक हे वन विभागाच्या बरोबरीने लोकांमध्ये जंगलाबद्दल जनजागृतीचे काम करत आहेत. निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करून शाश्वत विकासासाठी वनांचे महत्त्‍व स्थानिकांना पटवून देत आहेत. मुंबईहून आलेले पर्यटक डॉ. सुधीर गायकवाड, दीपा सापने, स्वानंद पाटील आणि त्यांचे सहकारी कोयना टीमसोबत पक्ष्‍यांची छायाचित्रे टिपत असताना वन्यजीव आणि पक्षी अभ्यासक संग्राम कांबळे, सागर जाधव व महेश शेलार यांना काही अंतरावर झुडपांमध्ये हालचाल आढळून आली.

त्यांनी सगळ्यांना शांत राहून वाहनामध्ये बसायला सांगितले. सगळेच त्या दिशेने बघायला लागले, तर झुडपातून अस्वल (sloth bear) बाहेर आले. त्यामुळे सगळेच अचंबित झाले. थोडी जरी चाहूल लागली की, जंगलात गायब होणारे निशाचर अस्वल, भरदुपारचे आज प्रत्यक्षात मोकळ्या मैदानात खात-खात पुढे सरकत होते. अस्वलाचे नाक हे हवेतील गंध आणि त्यातील बदल लगेच ओळखते. परंतु, या वेळी ते स्वतःच्या मस्तीमध्ये खाण्यात गुंग होते. पक्षी निरीक्षण करताना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील(sahyadri tiger project) अस्वल सगळ्यांना बघायला मिळाल्याने पर्यटक(tourism) खूष झाले.

Web Title: Pleasant Shock To Mumbai Tourists Because Bear Bear Sightings At The Sahyadri Tiger Reserve Project

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..