
वीर धरणावर पर्यटकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळ्यांना 'मोक्का'
सातारा : शिरवळ परिसरातील वीर धरणावर फिरायला आलेल्या पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीला शिरवळ पोलिसांनी जानेवारी महिन्यात बेड्या ठोकल्या होत्या, तर फलटण ग्रामीणच्या हद्दीत लुटमार करणाऱ्या टोळीला फलटण (Phaltan) ग्रामीण पोलिसांनी (Police) बेड्या ठोकून त्यांच्याविरोधात मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया (Police Manojkumar Lohia) यांनी मंजुरी दिली आहे. संबंधित दोन्ही टोळ्यांवर अनेक जिल्ह्यात दरोडा, चोऱ्यांचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Police Action Against Two Gangs Of Robbers At Phaltan Satara Crime News)
शिरवळ पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावामध्ये टोळी प्रमुख महावीर सुखदेव खोमणे, सदस्य शाहरूख महमुल्ला बक्षी, अमिर मौलाली मुल्ला, भैय्या हुसेन शेख, मयूर अंकुश कारंडे (सर्व रा. तावशी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्यासह एक अल्पवयीन युवकाचे नाव आहे. या टोळीने जानेवारी महिन्यात शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वीर धरणावर फिरायला आलेल्या पर्यटकांना लुटून त्यांच्याकडील किंमती ऐवज लुटून नेला होता. शिरवळ पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर वरील सर्व संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर सोलापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी असे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर आल्याने शिरवळ पोलिसांनी त्यांच्याविरोधात मोक्काचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यामार्फतीने विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाला लोहिया यांनी मंजुरी दिली आहे.
माणुसकीला काळीमा! मृताचा चेहरा दाखविण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून शे-पाचशेंची मागणी
फलटण ग्रामीण पोलिसांनी प्रस्ताव पाठवलेल्या टोळीतील आप्पा उर्फ रवि ज्ञानदेव माने (रा. तामशेतवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर), सदस्य पप्पू उर्फ सुहास किसन सोनवलकर (रा. वडले, ता. फलटण) यांनी सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, पुणे, मुंबईत जबरी चोरी, दरोडा, घातक हत्याराचा धाक दाखवून खंडणी मागणे यासारखे गुन्हे असल्याचे समोर आल्याने फलटण ग्रामीण पोलिसांनी त्यांच्याविरोधात मोक्काचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यामार्फतीने विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाला लोहिया यांनी मंजुरी दिली आहे. या कारवाईसाठी फलटणचे डीवायएसपी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Police Action Against Two Gangs Of Robbers At Phaltan Satara Crime News
Web Title: Police Action Against Two Gangs Of Robbers At Phaltan Satara Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..