esakal | माणुसकीला काळीमा! मृताचा चेहरा दाखविण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून शे-पाचशेंची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

माणुसकीला काळीमा! मृताचा चेहरा दाखविण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून शे-पाचशेंची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : सध्या जगावर कोरोना (Coronavirus) महामारीचं संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण आहे. जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार होतात. रुग्णांची व्यवस्थाही चांगली होते. पण, एकदा जम्बो सेंटरमध्ये (Jumbo Center) रुग्ण गेल्यानंतर किमान दोन दिवस त्याबाबतची माहितीच कळत नाही. अनेकांना तर आपला रुग्ण दगावल्याचीच माहिती मिळते. त्यामुळे रुग्णाचे अंतिम दर्शन व्हावे यासाठी अनेकजण जम्बोच्या बाहेर थांबून राहतात. त्यांना मृताचा चेहरा दाखविण्यासाठी 300 ते 500 रुपयांची मागणी केली जाते. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्या सारखाच हा दुर्देवी प्रकार आहे. त्यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांत संतापाची लाट आहे. याप्रकारावर त्वरित कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. (Government Staff Is Demanding Five Hundred Rupees From The Relatives Of Corona Patient)

जगात सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरु असली, तरी तिसरी लाट लवकरच येण्याचा अंदाज आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. कोरोना बाधित झाल्यानंतर अनेक रुग्ण घरीच उपचार घेतात. श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली की, मग रुग्णालयामध्ये जाण्याचे नियोजन केले जाते. ऑक्सिजन लेव्हल ७० पेक्षा कमी असेल तर अनेक रुग्णालये केवळ जम्बो सेंटरचेच नाव सुचवितात. त्यामुळे जम्बोवरही ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या आणि व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांना दाखल करुन घेण्यामध्ये अडचणी येत आहेत. तरीही अनेकांच्या दबावामुळे रुग्णांना दाखल करुन घेतले जाते. पुढे त्यांना ऑक्सिजन लावला जातो की व्हेंटिलेटर हे जम्बोमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाच माहित. मात्र, दोन दिवसांनंतर रुग्णाची सर्व माहिती नातेवाईकांना दिली जाते. त्यामुळे रुग्णांत भीती कमी होऊन उपचारास प्रतिसाद मिळत जातो.

वाढत्या रुग्ण संख्येत केंद्राच्या यादीत पुन्हा महाराष्ट्र

सध्या साताऱ्यात कोविड रुग्णांवर उपचार सुरु असले, तरी काही रुग्ण सुविधांपासून वंचित असल्याचे पहायला मिळत आहे. जम्बोमध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर तीन ते चार दिवस प्रकृती चांगली राहते. त्यामुळे नातेवाईकही निश्चित होतात. पण, एके दिवशी रुग्ण अत्यवस्थ असल्याचा आणि त्यानंतर दगावल्याचा फोन येतो आणि नातेवाईकांची हतबलता सुरु होते. रुग्णाला दाखल केल्यानंतर मागील चार पाच दिवसात डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारावरच त्यांनी समाधान मानलेले असते. त्यामुळे अखेरचे दर्शन घेण्यासाठी नातेवाईक आणि घरातील पत्नी, आई, मुले यांचा जीव कासावीस होत असतो. काही करुन त्यांना अंतिम दर्शन घडवायचे असते. खासगी रुग्णालयांमध्ये ते शक्य होते. पण, जम्बोमध्ये सरकारी नियम असल्यामुळे रुग्णांना कोविड बाधित मृताच्या जवळपास येऊ दिले जात नाही. याचा फायदा काही महाभाग घेऊ लागले आहेत.

लाॅकडाउन संपण्यास 3 दिवसांचा अवधी; वाचा जिल्हाधिका-यांचा नवा आदेश

जम्बोमधून रुग्ण बाहेर काढून नगरपालिकेच्या ताब्यात देताना त्यांचा चेहरा बघण्यासाठी चक्क पैशांची मागणी होऊ लागली आहे. समोरची व्यक्ती पाहून 300 किंवा 500 रुपयांची मागणी केली जात आहे. अशावेळी नातेवाईकही हतबल असतात. कुठे वाद घालायचा, सध्या परिस्थिती काय आहे याचा विचार करुन पैसे देण्यासाठी मागे पुढे पाहिले जात नाही. पण, असा होणारा प्रकार लाजिरवाणा आणि कर्मचाऱ्यांकडून माणुसकीला काळीमा फासणाराच आहे. त्यामुळे या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन हा धक्कादायक प्रकार थांबवून अशांवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांकडून केली जात आहे.

मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार

सातारा जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून जिल्ह्यातला मृत्यूदराचा आलेख वाढताना दिसत आहे. दररोज दोन हजाराच्यावरती रुग्ण जिल्ह्यात सापडत असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. जम्बो कोविडमध्ये आणि जवळपास मृत झालेल्या सर्वांना जम्बोमध्ये आणले जाते. त्याठिकाणाहून त्यांना नगरपालिकेच्या ताब्यात दिले जाते. दररोज मृत झालेल्या किमान ५० किंवा त्याहून अधिक लोकांची यादी येथील कर्मचाऱ्यांकडे असते. त्यामुळे प्रत्येकाकडून किमान 500 रुपये घेतले, तर एका दिवसात २५ हजारांची कमाई होते. पण, हा होणार प्रकार तिरस्कार आणि चीड आणणारा आहे. याप्रकारामुळे नागरिकांत प्रचंड नाराजीचा सूर आहे.

राष्ट्रवादीच्या माजी आमदारास अटक; पाेलीस काेठडीत रवाना

Government Staff Is Demanding Five Hundred Rupees From The Relatives Of Corona Patient

loading image
go to top