esakal | अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पाच ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पाच ताब्यात

sakal_logo
By
महेश बारटक्के

कुडाळ (जि. सातारा) : एका सहा वर्षीय मुलीला खाऊचे आमीष देऊन व अश्लील व्हिडिओ दाखवून सहा जणांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला असल्याची फिर्याद मेढा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी केडांबे (ता. जावळी) येथील सहापैकी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने जावळी तालुक्यात खळबळ माजली असून जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या प्रकरणी दाखल फिर्यादीवरून अनिकेत उर्फ कृष्णा रामचंद्र ऊर्फ रामजी सुतार, रामचंद्र ऊर्फ रामजी कोंडीबा ऊर्फ बबन सुतार, साहिल राजू ओंबळे, लक्ष्मण कोंडीबा ऊर्फ बबन सुतार (माईचे दादा), रवींद्र विश्वनाथ ओंबळे, निखिल उर्फ अनिकेत राजू ओंबळे (केडांबे, ता. जावली) यांच्यावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी १८ ते ६२ वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एप्रिल मे 2020 पासून ते 17 मार्च 2021 वेळोवेळी अनिकेत याने रहाते घरातील माळ्यावर, रामचंद्र ऊर्फ रामजी कोंडीबा ऊर्फ बबन सुतार याच्या शेतात असलेल्या वैरणीच्या गंजी जवळील झोपडीत, साहिल राजू ओंबळे याचे राहते घरात, लक्ष्मण कोंडीबा ऊर्फ बबन सुतार (माईचे दादा) याचे घरातील खोलीत, रवींद्र विश्वनाथ ओंबळे, निखिल उर्फ अनिकेत राजू ओंबळे याचे राहते घरात बेडवर संबंधित अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शरीर संबंध केले असल्याचे फिर्यादीत करण्यात आले आहे. या प्रकरणातील पाच जणांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनिकेत उर्फ कृष्णा रामचंद्र ऊर्फ रामजी सुतार हा अद्याप पाेलिसांना सापडलेला नाही. उपविभागीय पोलिस अधिकारी शितल खराडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने अधिक तपास करत आहेत.

साताऱ्यात कोरोनाचा कहर! कुडाळात सलग आठ दिवस जनता कर्फ्यू