esakal | साताऱ्यात कोरोनाचा कहर! कुडाळात सलग आठ दिवस 'जनता कर्फ्यू'
sakal

बोलून बातमी शोधा

Public Curfew

साताऱ्यात कोरोनाचा कहर! कुडाळात सलग आठ दिवस 'जनता कर्फ्यू'

sakal_logo
By
महेश बारटक्के

कुडाळ (सातारा) : राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाकडून पंधरा दिवसांसाठी संचारबंदीचे आदेश दिलेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू ठेवताना किराणा व भाजीपाला, तसेच बेकरी यांना अत्यावश्यक सेवेत ठेवण्यात आले असून त्यानिमित्ताने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. जावळी तालुक्यातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता कुडाळ ग्रामपंचायतीच्या प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी शुक्रवार 16 एप्रिल ते 23 एप्रिल या कालवधीसाठी सलग आठ दिवस जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या आठ दिवसांत केवळ मेडिकल व दवाखाना सोडून इतर सर्व दुकाने व अस्थापना बंद राहणार आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कुडाळ (ता. जावळी) येथील कुडाळ आपत्ती व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी व्यापारी वर्ग व भाजीपाला विक्रेत्यांच्या समवेत आज बैठक घेतली. यावेळी सर्वांनुमते घेतलेल्या निर्णयानुसार शुक्रवार १६ ते २३ एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला असल्याचे घोषित करण्यात आले. अत्यावश्यक सेवा (मेडिकल आणि दवाखाने) वगळता सर्व दुकाने व भाजीपाला बंद ठेवण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांत जावळीत 160 पेक्षा अधिक कोरोना रूग्ण आढळले आहेत. कुडाळ हे तालुक्यातील मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असल्याने परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी येथे होत असते, त्यामुळे कोरोना संसर्गाची वाढती साखळी तोडण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला असून अनेकजण अजूनही कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे आता अत्यंत कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही ही कारवाई सुरू होती, परंतु आता कठोर व्हावे लागणार असल्याचे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सोमनाथ कदम यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने सांगितले.

शाब्बास! ओडिशात कऱ्हाडच्या 'आयर्न मॅन'ची झक्कास कामगिरी

आपल्या कुटुंबाची काळजी असेल, तर जनता कर्फ्यू पाळा

जनता कर्फ्यू म्हणजे स्वयंशिस्त पाळणे होय. त्यामुळे हे बंद राहील का, ते बंद राहील का, दंड ठोठावला जाईल का, हे प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा आपण स्वत:हून काही दिवस अनावश्यक घराबाहेर पडणार नाही, असा प्रण करणे आवश्यक आहे. आपल्याला आपल्या कुटुंबाची चिंता असेल, काळजी असेल तर जनता कर्फ्यू पाळा', असे आवाहन जावळी पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी केले आहे. यादरम्यान केवळ वैद्यकीय सुविधा आणि औषधींची दुकाने वगळता काहीही सुरू राहणार नाही, याची काळजी व्यापाऱ्यांनी घ्यायची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सौरभ शिंदे, उपसभापती, जावळी पंचायत समिती

Edited By : Balkrishna Madhale