esakal | पहिली बायको असताना दुसरीसोबत 'लग्नाची गाठ'; पिंप्रदात वडिलांनी केला मुलाचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

Police

पहिली बायको असताना दुसरीसोबत 'लग्नाची गाठ'; पिंप्रदात वडिलांनी केला मुलाचा खून

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (सातारा) : पहिली बायको असताना दुसरीबरोबर लग्नाची गाठ बांधल्याच्या कारणावरून वडिलांनी कुऱ्हाडीचे घाव घालून मुलाचा खून केल्याची घटना पिंप्रद (ता. फलटण) येथे घडली. याप्रकरणी संशयित सिकंदर काळ्या तथा डिसमुख भोसले यास पोलिसांनी गुन्ह्यानंतर दोनच तासांत अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की सूरज सिकंदर भोसले (वय 30 रा. पिंप्रद) याने पहिली बायको असतानाही दुसरी बायको येडाबाई हिच्याबरोबर लग्नाची गाठ बांधल्याने त्याचे वडील सिकंदर काळ्या तथा डिसमुख भोसले (रा. पिंपरद) यांच्या मनात सूरज याच्याविषयी राग होता. काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गावातील वडरी आळीतील घरासमोर सिकंदर भोसले याने त्याचा मुलगा सूरज भोसले याच्यावर कुऱ्हाडीने डोक्‍यात व पायावर वार केले. यामध्ये सूरज हा मृत पावला. त्याची पत्नी दामिनी हिस जीवे मारण्याची धमकी दिली.

सातबारा उताऱ्यासाठी लाच घेताना तलाठी जाळ्यात; मसुरात 'लाचलुचपत'ची धडक कारवाई

याबाबतची फिर्याद मृत सूरज भोसले याची पत्नी दामिनी भोसले (वय 25 रा. पिंप्रद) हिने दिली. याची माहिती मिळताच दहिवडीचे पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उस्मान शेख करीत आहेत.

Edited By : Balkrishna Madhale

loading image