esakal | चोराच्या उलट्या बाेंबा! दिवशी घाटातील लुटमारीचा गुन्हा 24 तासांत उघडकीस
sakal

बोलून बातमी शोधा

चोराच्या उलट्या बाेंबा! दिवशी घाटातील लुटमारीचा गुन्हा 24 तासांत उघडकीस

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेनुसार व पोलिस उपअधीक्षक अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पवार, श्री. खराडे, प्रशांत चव्हाण, चंद्रकांत पाटील, कपिल आगलावे यांनी तांत्रिक बाबी तपासून हा तपास यशस्वी केल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

चोराच्या उलट्या बाेंबा! दिवशी घाटातील लुटमारीचा गुन्हा 24 तासांत उघडकीस

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : दिवशी घाटाच्या परिसरात कार अडवून महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास केल्याच्या गुन्ह्याचा येथील पोलिसांनी 24 तासांत उलगडा केला. त्या महिलेला दवाखान्यातून घरी घेऊन चाललेला कारचालकच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार निघाल्याचे पोलिसांनी गुरुवारी रात्री पत्रकार परिषदेत सांगितले. संशयित व त्याच्या अन्य एका साथीदाराकडून पोलिसांनी चोरीस गेलेले दागिने जप्त केले आहेत.
 
शिद्रुकवाडी येथील हौसाबाई लक्ष्मण कोळेकर (वय 70) आजारी असल्याने त्यांची मुलगी छाया व चुलत नातू अंकुश पवार हे त्यांना मोटारीतून तळमावले येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले होते. तेथे उपचारानंतर दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा ते दिवशी घाटमार्गे गावाकडे निघाले. दुपारी दोनच्या सुमारास शिद्रुकवाडीपासून दोन किलोमीटरवर गाडी आली असताना एका निर्जन ठिकाणी लंगडत चालण्याचे ढोंग करत आडव्या आलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांची मोटार अडवत आत घेण्याची विनंती केली. यावेळी श्री. पवार यांनी मोटारीची काच खाली करताच चोरट्याने सुऱ्याचा धाक दाखवत चालकाकडील दरवाजा दाबून धरत दुसऱ्या हाताने पाठीमागचा दरवाजा उघडला आणि हौसाबाई यांच्या गळ्यातील सोनसाखळी व बोरमाळ हिसकावली. शेजारी बसलेल्या छाया यांनी दागिने ओढून धरत चोरट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, झटापटीत हाताला सुरा लागून त्या जखमी झाल्या. चोरट्याने दागिने घेऊन डोंगर उताराने पळ काढल्यानंतर अंकुश यांनी गाडीबाहेर पडून दूरपर्यंत त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. यावेळी घटनास्थळापासून काही अंतरावर आणखी एक अनोळखी व्यक्ती उभी असल्याचे पाहिल्याचेही त्यांनी सांगितले. घटनास्थळी ग्रामस्थ दाखल झाल्यानंतर दूरपर्यंत त्यांची चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीही परिसर पिंजून काढला. मात्र, चोरटे हाती लागले नव्हते.

पोलिस उपअधीक्षक अशोकराव थोरात व सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांना कारचालक अंकुश पवार याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी तपासात त्याच्यावर लक्ष केंद्रित केले व कौशल्याने 24 तासांत गुन्ह्याचा उलगडा करत चोरीला गेलेले सुमारे एक लाख 20 हजार रुपयांचे दागिने जप्त केले. घाटातील एका कठड्याजवळ हे दागिने लपवून ठेवलेले होते. अंकुशने एका सहकाऱ्याच्या मदतीने हा चोरीचा प्रकार घडवून आणल्याची माहिती तपासातून समोर आल्याचे पोलिस अधिकारी अशोकराव थोरात व संतोष पवार यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेनुसार व पोलिस उपअधीक्षक अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पवार, श्री. खराडे, प्रशांत चव्हाण, चंद्रकांत पाटील, कपिल आगलावे यांनी तांत्रिक बाबी तपासून हा तपास यशस्वी केल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

साताऱ्यात 184 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित; जिल्हा परिषदेच्या सर्वेक्षणातून माहिती स्पष्ट

शाळा बंद असताना विद्यार्थी शिष्यवृत्तीला कसे सामोरे जाणार?; पालकांत परीक्षेबाबत अनास्था

जिल्हा बॅंकेसाठी पालकमंत्री की ऍड. उदयसिंह पाटील?; शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपुढे पेच

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top