मित्राचा खून करणारे सहा तासांत वाईतील एमआयडीसीत सापडले; अनैतिक संबंधाचा संशय

मित्राचा खून करणारे सहा तासांत वाईतील एमआयडीसीत सापडले; अनैतिक संबंधाचा संशय

Published on

खंडाळा (जि.सातारा) : अनैतिक संबंधाचा संशय घेऊन झालेल्या किरकोळ भांडणातून पारगाव येथील एसटी डेपो परिसरात भर रस्त्यावर चाकूने सपासप वार करत खंडाळ्यातील युवकाचा त्याच्याच मित्राने खून केला. रविवारी (ता.19) रात्री नऊ वाजता घडलेल्या या घटनेनंतर अवघ्या सहा तासांतच पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. या दोघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! 
 
असिफ गुलाब शेख (वय 23, रा. आदित्य सोसायटी, खंडाळा) असे मृताचे नाव असून, अक्षय सुनील मोहिते (वय 23, रा. अजनूज, ता. खंडाळा) व अमित शिवाजी चव्हाण (वय 24, रा. पारगाव) अशी संशयितांची नावे आहेत. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले, की अक्षय, अमित व असिफ हे तिघे मित्र आहेत. रविवारी रात्री जेवायला घेऊन जातो म्हणून अक्षय हा असिफला पारगावला घेऊन गेला. तेथे त्याने असिफच्या छाती व मांडीवर चाकूने सपासप वार केले. त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असिफचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी अमित चव्हाण हाही तेथे उपस्थित होता. अक्षय हा एका हाताने अपंग असूनही खून केल्यानंतर त्याने मोटारसायकलवरून पोबारा केला. या प्रकरणी असिफचा भाऊ अल्ताफ शेख याने फिर्याद दिली. 

सिद्धेश्वर मंदिरात 83 वर्षांची श्रावणातील परंपरा का खंडित झाली, वाचा सविस्तर

'सत्ता, पैसा काहीच नको पण आपली अमरावती वाचली पाहिजे', वाचा असे कोण म्हणाले...

पोलिसांनी अमितला घटनास्थळीच ताब्यात घेतले. ही घटना खंडाळा-अजनूजच्या भर रस्त्यावर व दाट लोकवस्ती असणाऱ्या भागात घडली. पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे व शिरवळचे पोलिस निरीक्षक उमेश हजारे व खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. श्री. हजारे यांच्यासह शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची माहिती घेतली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक स्वाती पवार, पोलिस हवालदार गिरीश भोईटे, संजय धुमाळ, तुषार कुंभार, विठ्ठल पवार व भुईंजचे श्री. कदम यांनी रविवारी रात्री वाईतील केंजळ येथील एमआयडीसीतील पत्र्याच्या शेडमधून अक्षयला ताब्यात घेतले. अवघ्या सहा तासांतच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक स्वाती पवार तपास करीत आहेत. 

लॉकडाउनमध्ये निघाले २६ टक्के पॉझिटिव्ह! सरासरीनुसार रोज ३०३ बाधित

कळमेश्वरात भरदिवसा घडली थरकाप उडवणारी घटना; घरात घुसून अज्ञात तरुणांनी... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com