मुलीवर अत्याचारप्रकरणी बोरगाव पोलिसांनी विजापूरातील युवकास पकडले

सुनील शेडगे
Sunday, 20 December 2020

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

नागठाणे (जि. सातारा) : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संशयित युवकास बोरगाव पोलिसांनी कर्नाटक राज्यातून अटक केली. अमोघसिद्ध महादेव कुंभार (वय 22, रा. अहेरसंग, ता. इंडी, जि. विजापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन ही मुलगी लहानपणापासून तिच्या आजोळी राहते. सोमवारी सकाळी मुलीला घरी यावयाचे असल्यामुळे तिला आजोळहून भावाने एसटी बसमध्ये बसवून दिले. मुलीला बसमध्ये बसवून दिल्याची माहिती त्याने फोनवरून घरी दिली होती. मात्र, सायंकाळी उशीर झाला तरी मुलगी घरी न आल्यामुळे नातेवाईकांनी परिसरात तिचा शोध घेतला. तिचा ठावठिकाणा न लागल्यामुळे मंगळवारी रात्री कुटुंबीयांनी बोरगाव पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कऱ्हाड तालुक्यातील वडगावात वनविभागाच्या खाणीत मृतावस्थेत बिबट्या आढळल्याने घबराट
 
पोलिस तपास करत असतानाच ही मुलगी अचानक घरी परतली. कुटुंबीयांनी मुलीस बोरगाव पोलिस ठाण्यात आणले. या वेळी तिच्याकडे अधिक चौकशी केली असता मुलीस अमोघसिद्ध कुंभार याने इंडी (कर्नाटक) येथे बोलावून घेऊन तेथील एका लॉजवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. घटनेचे गांभीर्य ओळखत सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ हे हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम, राहुल भोये व विशाल जाधव यांच्यासह इंडी (कर्नाटक) येथे शुक्रवारी सकाळी रवाना झाले. 

तेथे कर्नाटक पोलिस व सायबर सेलच्या मदतीने कर्नाटकातील नाद गावच्या शिवारात लपलेल्या संशयित अमोघसिद्ध कुंभार याला ताब्यात घेत अटक केली. शनिवारी पहाटे त्याला बोरगाव येथे आणण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

गुरूवार पेठेतील एकावर कोयत्याने सपासप वार; साताऱ्यात चौघांवर गुन्हा

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Arrested Youth From Vijapur Satara News