
जिल्ह्यामध्ये दहशत पसरविणाऱ्या गुंडावर यापुढेही अशाच प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक बन्सल यांनी दिला आहे.
सातारा : कऱ्हाड शहर हद्दीत खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या टोळीतील चौघांना पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सातारा जिल्ह्यासह सांगलीतील लगतच्या तालुक्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. अभिनंदन रतन झेंडे (वय 39, रा. शनिवार पेठ, कऱ्हाड), प्रतीक उर्फ बबलू परशुराम चव्हाण (वय 25, रा. रैनाक गल्ली, शनिवार पेठ, कऱ्हाड), परशुराम रमेश करवले (वय 20, रा. कृष्णा घाट, सोमवार पेठ, कऱ्हाड), अविनाश प्रताप काटे (वय 23, रा. महात्मा फुले चौक, बुधवार पेठ, कऱ्हाड) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर गर्दी मारामारी, खुनाचा प्रयत्न, बेकायदा हत्यार बाळगणे, खंडणी, जबरी चोरी, सरकारी नोकरांना मारहाण करून गंभीर जखमी करणे असे विविध गंभीर स्वरूपाचे कायदे आहेत.
त्यांच्या वर्तनात सुधारणा होण्यासाठी वारंवार प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या, तरीही त्यांच्या सुधारणा झाली नाही. अगदी हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे सुरू असतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. या टोळीचा सर्वसामान्य नागरिकांना उपद्रव होत होता. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यामुळे त्यांना हद्दपार करण्याबाबत कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता.
महाबळेश्वर : कर्जाच्या फसवणुकप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या एकास अटक; औरंगाबादच्या एकाचा शाेध सुरु
असे साहेब किती, सांमटीत हिंडे राती; 'ही' म्हण क-हाड पालिकेत ठरली खाेटी
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ यांनी छाननी करून हा प्रस्ताव अधीक्षक बन्सल यांच्यासमोर पाठविला होता. या प्रस्तावाच्या सुनावणी दरम्यान सहायक फौजदार मधुकर गुरव यांनी ठोस पुरावे सादर केले. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून अधीक्षक बन्सल यांनी चारही संशयितांना संपूर्ण सातारा जिल्हा, तसेच सांगली जिल्ह्यातील कऱ्हाडच्या लगत असलेल्या कडेगाव, वाळवा व शिराळा या तीन तालुक्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्योच आदेश काढले आहेत. जिल्ह्यामध्ये दहशत पसरविणाऱ्या गुंडावर यापुढेही अशाच प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक बन्सल यांनी दिला आहे.
बसण्यापूर्वीच करा वयाचा विचार, अन्यथा खावी लागणार तुरुंगाची हवा; जाणून घ्या हे महत्वाचे नियम
Edited By : Siddharth Latkar