

Satara Shock: Police Raid Uncovers Illegal Explosives Cache Near Residential Area
sakal
मायणी: येथील गरवारे वस्तीनजीक जिलेटिनसह स्फोटक पदार्थांचा बेकायदेशीरपणे केलेला तब्बल १७ लाख नऊ हजार ९०० रुपयांचा साठा पोलिसांनी आज जप्त केला. याप्रकरणी विशाल लक्ष्मण जाट (वय २१) व बारुलाल लक्ष्मण जाट (वय २२, मूळ रा. जाट मोहल्ला, ता. रायपूर, जिल्हा भिलवाडा, राजस्थान) या दोघा भावांना पोलिसांनी अटक केली असून, मूळमालक शंकर बेनीराम चौधरी (रा. मायणी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.