Satara Crime: 'म्हसवडमध्ये दोन चंदन चोरट्यांना अटक'; कारवाईत पोलिसांकडून एक लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

Mhaswad Police Nab Sandalwood Smugglers: धामणी गावातील शेतकरी समाधान नागरगोजे यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या शेतातील चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी त्यांच्या पथकासह तत्काळ तपास सुरू केला.
Mhaswad Police Nab Sandalwood Smugglers; Valuable Logs Recovered
Mhaswad Police Nab Sandalwood Smugglers; Valuable Logs RecoveredSakal
Updated on

म्हसवड : चंदनाच्या झाडांची चोरी करून पसार झालेल्या चोरट्यांना म्हसवड पोलिसांनी अटक केली. या कारवाईत एक लाख १० हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.उमाजी उत्तम चव्हाण (रा. लोधवडे, ता. माण) व प्रमोद अण्णा धोत्रे (रा. नरवणे, ता. माण) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com