
भोसे : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्त पाचगणी येथे पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यावेळी नववर्ष स्वागतोत्सव शांततेत पार पाडावा, यासाठी पोलिसांनी हुल्लडबाजांवर वॉच ठेवण्याची मोहीम आखली आहे. त्यानिमित्त बाजारपेठेतून संचलनही करण्यात आले.