Video पाहा : चर्चाच चर्चा! पोलिस पाटलाच्या लग्नापुर्वीच्या कृतीचे चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sagar Yadav

चर्चाच चर्चा! पोलिस पाटलाच्या लग्नापुर्वीच्या कृतीचे चर्चा

तांबवे (जि. सातारा) : विवाहाला (marriage) काही तासांचा अवधी असतानाच थेट शिबिरात येऊन रक्तदान (blood donation) करणाऱ्या पाठरवाडीचे पोलिस पाटील सागर यादव यांचे भागात कौतुक होत आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या (shivrajyaabhishek din) पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील युवा संघटनेतर्फे घेतलेल्या रक्तदान शिबिरात (blood donation camp) त्यांनी प्रापंचिक कर्तव्यपूर्तीतून राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याने सागर यांचा सत्कारही करण्यात आला. (police-patil-sagar-yadav-donated-blood-before-marriage-satara-positive-news)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त प्रदीप पाटील युवा संघटनेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन दरवर्षी होते. मागील वर्षी 127 जणांनी रक्तदान केले होते. रविवारी तांबवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिबिर झाले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील, प्रदीप पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, सुपने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा हुंदरे, सरपंच शोभाताई शिंदे, सरपंच अशोक झिंबरे उपस्थित होते.

हेही वाचा: ..तर देशाचे तुकडे हाेण्यास वेळ लागणार नाही

डोंगरावर वसलेल्या पाठरवाडीचे पोलिस पाटील सागर यादव यांचा रविवारी (ता.6) विवाह होता. तत्पूर्वी त्यांनी देवदर्शन करून थेट शिबिरात येऊन रक्तदान केले. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार झाला. विवाहापूर्वी राष्ट्रीय कर्तव्याला लावलेल्या हातभाराची चर्चा परिसरात होती.

यावेळी पाेलिस पाटील यादव ई-सकाळशी बाेलताना म्हणाले मी वेगळे असं काही केलेले नाही. कळत्या वयापासून मी रक्तदान करीत आहे. आज आपले लग्न असले म्हणून काय झाले प्रथम राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य दिले पाहिजे हा हेतुने रक्तदान केले. ग्रामस्थांसह आपण माझ्या कृतीचे काैतकु केले याचा आनंद वाटताे. सध्याच्या या संकट काळात प्रत्येकजण काही ना काही तरी गरजूंना मदत करीत आहे. हीच भावना समाजास एकजूट ठेवण्यात उपयुक्त ठरेल.

ब्लाॅग वाचा

टॅग्स :SataraMonday Motivation