
खंडाळा: पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव खंडाळा येथील मोनाली लॉजवर छापा टाकून पोलिसांनी कुंटणखाना चालविणाऱ्या सात जणांना अटक केल्याची घटना गुरुवारी घडली. एरव्ही गुन्हेगारीचे प्रमाण कमी असणाऱ्या पारगाव खंडाळा येथे झालेल्या या कारवाईबाबत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.