आशा स्वयंसेविकेस डाळमोडीत मारहाण

तिघांवर तक्रार दाखल; कोविड सर्व्हे करताना प्रकार
Crime News
Crime NewsCrime News

कातरखटाव (जि. सातारा) : डाळमोडी (ता. खटाव) येथील आशा स्वयंसेविका वनिता भुजबळ यांचा कोविड सर्व्हे सुरू असताना तिघांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. याबाबत आशा स्वयंसेविकेने वडूज पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, वनिता भुजबळ या डाळमोडी येथे आशा स्वयंसेविका म्हणून काम करीत आहेत.

त्या गावातील कोरोना सर्व्हे करून दररोज माहिती आरोग्य खात्याला देत असतात. गावतील खोडसे कुटुंबाचा सर्व्हे करण्यासाठी गेल्या असता भुजबळ यांना काही अपशब्द बोलण्यात आले. आम्हाला कोरोना झाला नाही, असे म्हणत शकुंतला खोडसे यांनी काठीने पाठीत मारहाण करून ढकलून दिले. भुजबळ यांना मारहाण करून उलट त्यांच्यावरच खोडसे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. आरोग्य खात्याचा पाठपुरावा घेऊन भुजबळ यांनी शकुंतला खोडसे, इंद्रजित खोडसे, राज खोडसे यांच्याविरुद्ध वडूज पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com