नदीत उडी टाकून जीवन संपवण्याचा महिलेचा प्रयत्न; पोलिसांनी दाखवले 'शौर्य'

ढेबेवाडी जवळ असलेल्या वांगनदीवरील जुन्या पुलावर वृद्ध महिला आत्महत्या करण्याच्या उद्देशाने गेलेली होती.
Police
Policeesakal

ढेबेवाडी (सातारा) : गर्द काळोखात दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत (River) उडी घेण्याच्या तयारीत असलेल्या वृद्ध महिलेचे (Woman) प्राण तीन होमगार्डसच्या (Police) प्रसंगावधानामुळे वाचले. ढेबेवाडी येथील वांगनदीवरील जुन्या पुलावर ही घटना घडली. (Police Save Life Of Dhebewadi Woman Satara News)

याबाबतची माहिती अशी, या विभागातील एका गावातील ७५ वर्षीय महिला घरात शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून रात्री साडेसातच्या सुमारास ढेबेवाडी जवळच असलेल्या वांगनदीवरील जुन्या पुलावर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने गेलेली होती. त्यावेळी जोरदार पाऊस सुरू असल्याने वांगनदी दुथडी भरून वाहत होती. रात्रीच्या अंधारात महिलेला पुलाकडे जाताना पाहून संशय आल्याने काही वाहन चालकांनी येथील बसस्थानक चौकात बंदोबस्तास असलेले होमगार्ड वैभव माने, विशाल मोरे व अक्षय भाईंगडे यांना त्याबाबत सांगितले. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता तिघांनीही तिकडे धाव घेतली.

नव्या पुलावर उभे राहून बॅटरीच्या उजेडाने त्यांनी जुन्या पुलावर थांबलेल्या महिलेचा अंदाज घेतला. ती कोणत्याही क्षणी नदीत उडी घेईल अशी शक्यता असल्याने महिलेला बोलण्यात गुंतवून तिन्ही होमगार्ड वेगवेगळ्या वाटांनी तिच्यापर्यंत पोहचले आणि नदीत उडी टाकतानाच तिला पकडून दुचाकीवरून पोलिस ठाण्यात घेऊन आले. तेथे महिलेच्या नातेवाईकांना बोलावून सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांनी सर्वांचे चांगले समूपदेशन करत त्या आजीला नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या प्रसंगात तत्परता दाखवून महिलेचे प्राण वाचविल्याबद्दल पोलिस अधिकारी संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिन्ही होमगार्डचे कौतुक केले. नागरिकातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Police Save Life Of Dhebewadi Woman Satara News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com