
कऱ्हाडला पोलिसांनी पकडला दिड लाखांचा गुटखा
-सचिन शिंदे
कऱ्हाड : शहर पोलिसांनी (city police)येथील कोल्हापूर (kolhapur) नाका परिसरातील पोपटभाई पेट्रोल पंप(Petrol pump) चौकात रात्री गस्त घालताना उशिरा गुटख्याची तस्कारी रोखली. त्यात पोलिसांनी तब्बल एक लाख ६० हजारांचा गुटखा (Gutkha)जप्त केला. त्यात दोघांना अटक आहे. प्रसाद अनिल देशमाने (वय २४, रा. सावळेश्वर मंदीराजवळ, पुसेसावळी) आणि आकाश दत्तप्रसाद बाचल (२२, रा. गणपती मंदीराजवळ, पुसेसावळी) अशी त्यांची नावे आहेत. कारवाईत दोन लाखांची कारही जप्त आहे.पोलिसांनी सांगितले की, येथील गुन्हे शाखेचे पोलिस रात्रगस्त घालताना पट्रोलिंग करत होते. यावेळी शहरात नाकाबंदी होती. त्यावेळी येथील पोपटभाई पेट्रोलपंप शेजारी वाहतुक नियंत्रण शाखेचे सहायक फौजदार राजू पाटील, पोलिस हवालदार पुजा पाटील, बीट मार्शलचे संग्राम पाटील व दिपक पाडळकर बंदोबस्त करत होते.
त्यावेळी त्यांनी सिल्वर रंगाची ईस्टम कार (एमएच १४ एएम ९०९२) तेथे अडवली हवालदार पाटील यांना त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांना संशय आल्याने त्यांनी कार तपासली त्यावेळी त्यात गुटखा सापडला. कारमधील दोघांना ताब्यात घेवून चौकशी केली. त्यांना पोलिस ठाण्यात आणून गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक अमीत बाबर व यांनी विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी तो गुटखा कर्नाटकातून आणल्याचे सप्पष्ट जाले. कारवाईत एक लाख ५९ हजारांचा विमल पानमसाला गुटखा आणि दोन लाखांची कार जप्त केली आहे. कारवाई दरम्यान दोन संशयीत इसमांना अटक करणेत आलेली आहे. नमुद गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर करत आहेत. गाडीसह पुढील कारवाईसाठी मुद्देमाल अन्न व औषध प्रशासन विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी रोहन शाह यांना कळवले आहे.