esakal | पोमन खून प्रकरणातील संशयिताकडून दोन पिस्तूल, काडतूस जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Poman Murder Case

येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना झालेल्या वादातून वैभव जगताप व ऋषिकेश पायगुडे यांनी जामिनावर सुटल्यानंतर मंगेशचा खून करून मृतदेह वाठार बुद्रुक येथील नीरा उजवा कालव्यात टाकला होता.

पोमन खून प्रकरणातील संशयिताकडून दोन पिस्तूल, काडतूस जप्त

sakal_logo
By
रमेश धायगुडे

लोणंद (सातारा) : वाठार बुद्रुक (ता. खंडाळा) येथील पोमन खून प्रकरणातील (Poman Murder Case) अटक केलेल्या संशयितांकडून पोलिसांनी गावठी बनावटीचे दोन पिस्तूल (Pistol) व जिवंत काडतूस हस्तगत केले. लोणंद पोलिसांकडून (Lonand Police Station) मिळालेल्या माहितीनुसार, वाठार बुद्रुक येथे नीरा उजव्या कालव्यात (Nira canal) पोमणनगर-पिंपळे (ता. पुरंदर) येथील मंगेश सुरेश पोमन (वय ३५) याचा मृतदेह सापडला. (Police Seized Two Pistol From The Accused In The Poman Murder Case Satara Crime News)

येरवडा कारागृहात (Yerawada central jail) शिक्षा भोगत असताना झालेल्या वादातून वैभव जगताप व ऋषिकेश पायगुडे यांनी जामिनावर सुटल्यानंतर मंगेशचा खून करून मृतदेह वाठार बुद्रुक येथील नीरा उजवा कालव्यात टाकला होता. या प्रकरणी पोलिसांनी वैभव सुभाष जगताप (वय २८, रा. पांगारे, ता. पुरंदर) यास प्रथम अटक केल्यावर त्याने या खुनाची कबुली दिली. त्यानंतर ऋषिकेश पायगुडे याला नाशिक येथे आंबाड परिसरात अटक केली. पोलिस कोठडी मिळाल्यानंतर त्याच्याकडे कसून तपास केला असता तो अट्टल गुन्हेगार असल्याचे आणि पुणे येथून तडीपार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून पुणे येथून या खुनाच्या गुन्ह्यात वापरलेले गावठी बनावटीचे दोन पिस्तूल, एक जिवंत काडतूस व मोटारसायकल हस्तगत केली.

हेही वाचा: साम-दाम, दंड, भेद नितीसह ताकदीनं कृष्णाच्या निवडणुकीत सामील : विश्वजीत कदम

दरम्यान, ऋषिकेशचा गुन्हेगारी टोळीशी संबंध आहे का, याचा पोलिस शोध घेत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल (Superintendent of Police Ajay Kumar Bansal), अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, गुन्हे प्रकटीकरण पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर हे तपास करत आहेत.

Police Seized Two Pistol From The Accused In The Poman Murder Case Satara Crime News

loading image