esakal | कोरेगावात 101 वाहन चालकांवर पोलिसांची धडक कारवाई

बोलून बातमी शोधा

Police

कोरेगावात 101 वाहन चालकांवर पोलिसांची धडक कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव : शहरात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कोरेगाव पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, अशा तब्बल 101 वाहनांकडून आज 20 हजारांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे.

कोरेगाव शहर आणि तालुक्‍यातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 101 वाहनांवर कारवाई करत 20 हजारांहून अधिक दंड वसूल केला. कोरोना रोखण्यासाठी शासनाने अत्यंत कडक नियम लागू केले आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर निर्बंध घातले असून, पोलिस कारवाईचे आदेश दिलेत.

तांबवेतील नंदकिशोरचा राजधानीत झेंडा; दिल्लीत पहिल्याच प्रयत्नात 'यश'

त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक उपनिरीक्षक विजय जाधव, केशव फरांदे, हवालदार मिलिंद कुंभार, धनंजय दळवी, अमोल सपकाळ, किशोर भोसले, वाहतूक नियंत्रण शाखेचे समाधान गाढवे, महेश जाधव, जस्मीन पटेल, प्रशांत लोहार यांच्यासह गृहरक्षक दलाच्या जवानांनी शहरातील विविध ठिकाणी विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या 101 दुचाकीस्वारांवर कारवाई करत 20 हजारांहून अधिक दंड वसूल केला. काही जण विनाकारण नियम मोडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी कोरेगाव शहरासह पुसेगाव, रहिमतपूर व वाठार स्टेशन पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी जप्त करून संबंधितास पोलिस ठाण्याच्या आवारात क्वारंटाइन केले जाणार आहे, असा इशारा पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी दिला आहे.

Edited By : Balkrishna Madhale