

Leaders from opposition parties during discussions amid growing political activity in Satara district.
Sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड: जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्यामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले आहे. या वेळी पालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपला रोखण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी एकत्र येऊन स्थानिक आघाड्यांच्या माध्यमांतून निवडणूक लढवून जिंकली. त्यातून स्थानिक पातळीवर तडजोडी करून निवडणूक लढवली तर यश येते, हा विश्वास आल्याने नेत्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठीही स्थानिक आघाडीचा पॅटर्न जिल्हाभर राबवण्यासाठी शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्याला कितपत यश येणार? हे लवकरच समोर येईल.